पेपरडोसा

       पेपरडोसा हा सर्वांना आवडतो. नाश्त्यासाठी पेपरडोसा अतिशय उत्तम आहे एकदा नक्की करून पहा. खाली दिलेल्या पद्धतीनें घरीच बनवा हॉटेल सारखा पेपरडोसा.

साहित्य :-  ३ वाटी तांदूळ, १ वाटी उडीद डाळ, ½ वाटी तेल, २ टी स्पून मीठ, कांदा, 

कृती -  
१) तीन वाटी तांदूळ व १ वाटी उडीद डाळ स्वच्छ धुवून एक दिवस अगोदर पाच ते सहा भिजू घाला. वेगवेगळे भिजू घाला.

२) नंतर रात्री मिक्सरमध्ये ते बारीक करून घ्या किंवा वाटून घ्या. व दोन्ही एकत्र करून झाकून ठेवा.

३) दुसऱ्या दिवशी सकाळी त्यात २ टी स्पून मीठ व ½ वाटी तेल घालून चांगले हलवून घ्या.

४) नंतर तव्याला तेल तावून तो तापायला ठेवा. व कांदा मधून चिरून त्याचे दोन भाग करा.

५) तवा गरम होऊन त्याच्यातून धूर निघायला लागल्यावर अर्धा कापलेला कांदा त्यावरून फिरवा. यामुळे तवा सेट होतो व डोसा उत्तम होतो.

६) तव्यावर थोडे पाणी शिंपडा व वाटीने थोडेसे पीठ तव्यावर टाका. व वाटी लगेच पाण्यात बुडवून त्याच्यावरून फिरवा. यामुळे डोसा पातळ व जाळीदार होईल.

७) तर आपला पेपरडोसा तयार झाला. त्याच्याबरोबर खोबऱ्याची चटणी व बटाट्याची भाजी अतिशय उत्तम लागते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या